Namo Shetkari Mahasamman Yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ‘नमो’च्या दुसऱ्या हप्त्याचा निधी मंजूर : कृषिमंत्री,बघा कधी येणार खात्यात

Namo Shetkari Mahasamman Yojana 2024 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ‘नमो’च्या दुसऱ्या हप्त्याचा निधी मंजूर : कृषिमंत्री,बघा कधी येणार खात्यात

कास्तकार न्यूज : Namo Shetkari Mahasamman Yojana 2024 : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेत महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली.

या अंतर्गत दरवर्षी पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6 हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटी रुपये वितरणास मान्यता देण्यात आली.

Namo Shetkari Mahasamman Yojana 2024

Mumbai : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली असून, या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

90 लाख शेतकऱ्यांना मिळणार दुसरा हप्ता :

नमो महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

86 लाख शेतकऱ्यांना मिळाला पहिला हप्ता :

नमोचा पहिला हप्त्यापोटी एप्रिल ते जुलै 2023 या काळात 1 हजार 720 कोटी रुपये निधीचे राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1792 कोटी रुपये निधी वितरित केला असून, याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर कृषिमंत्री मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली. या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 13 लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

Leave a Comment