Changes in LPG cylinder 2024 : मित्रांनो, ‘प्युअर फॉर शुअर’ नावाने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गत बीपीसीएलचा एलपीजी सिलिंडर ग्राहकाच्या घरी पोहोचवताना सील प्रूफ असेल. तसेच यात आता QR कोडही दिसून येईल. विशेष म्हणजे देशातील अशा प्रकारची पहिलीच सेवा आहे
Changes in LPG cylinder 2024
ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सिलिंडरची गुणवत्ता आणि प्रमाण याची हमी देण्यासाठी बीपीसीएल कंपनीने ‘प्युअर फॉर शुअर’ नावाने नवीन सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना घरपोच दिल्या जाणाऱ्या सिलिंडरवर छेडछाड प्रूफ सील असेल. तसेच एक QR कोड देखील असेल. या QR कोडमध्ये सिलिंडर बाबतची सर्व माहिती असेल.
कमी वजनामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद
रिकाम्या सिलिंडरमध्ये तेल भरून त्याचा काळाबाजार करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. या प्रकाराबाबत कंपनीकडे अनेक तक्रारी आल्यात. तसेच सिलिंडरचे वजन कमी भरत असल्यानेही ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यावर उपाय म्हणून कंपनीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह दिसेल पॉप-अप
सिलिंडरबाबत कंपनीने दिलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर, ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह एक खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप दिसेल. यावर, सिलिंडरशी संबंधित सर्व तपशील पॉप-अपमध्ये उपलब्ध आहेत.
सिलिंडर भरल्यावर त्याचे एकूण वजन किती होते? यामुळे तुम्हाला सीलचे चिन्ह आहे की नाही याची माहिती मिळेल. यामुळे ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्यांचा सिलिंडर सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यास मदत होईल.
तर होणार नाही QR कोड स्कॅन
सिलिंडरच्या सीलमध्ये छेडछाड झाली असेल तर QR कोड स्कॅन केला जाणार नाही. पुढील वितरण बंद राहणार असल्याचेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एलपीजी इकोसिस्टममध्ये काही जुन्या समस्या आहेत.
ट्रान्झिटमध्ये चोरी, अपेक्षित वितरण वेळेवर ग्राहक न दिसणे, रिफिल डिलिव्हरीसाठी स्वत:चा वेळ निवडणे इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यात ही सुविधा मदत करेल.