Mahila Samridhi Karj Yojana : महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग बचत गटांसाठी ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ राबवत आहे.
या अंतर्गत महिलांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर केवळ चार टक्के दराने व्याज आकारले जाते. या योजनेंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू
करण्यासाठी चार टक्के व्याजदराने 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरी असतात, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी
थाटलेले उद्योग अल्पावधीतच भरभराटीस आले आहेत. त्या अनुषंगाने महिला समृद्धी कर्ज योजना अंमलात आली आहे. याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेत आर्थिक स्वावलंबी झाले पाहीजे.
Mahila Samridhi Karj Yojana
काय आहे महिला समृद्धी योजना? : एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशी एक योजना आहे.
महिला बचतगट शासकीय योजना अंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
चार टक्के दराने मिळते महिलांना कर्ज ?
महिला बचतगट शासकीय योजना अंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Mahila Samridhi Karj Yojana
Mahila Samridhi Karj Yojana
सदर योजनेचे निकष काय ?
लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा एससी प्रवर्गातील असायला हवा. बचतगट व मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजक या योजनेंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत. लाभार्थीचे वय किमान 18 ते 50 वर्षे असायला हवे.
योजनेचा अर्ज करण्यासाठी किंवा लाभासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाइल नंबर
- ई-मेल आयडी
- बँकेचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.