Whatsapp Ban Kase Kadave : व्हॉट्सअप बॅन होण्याची कारणं कोणती? सोप्पंय, ज्या ज्या सेवा, फिचर्स व्हॉट्सअप देतं त्याचा गैरवापर करणं, हे झालं प्रमुख कारण मात्र एखादी ऍक्टिव्हिटी गैर आहे की नाही हे कसं ठरवणार? तर…
- तुम्ही ओळखीतल्या किंवा अनोळखी लोकांच्या नंबरवर संदेश/मेसेज पाठवले असतील.
- तुम्हाला मिळालेल्या मेसेजपेक्षा तुम्ही जास्त मेसेज पाठवले असतील.
- व्हॉट्सअप ग्रुप चॅनेलवर परवानगीशिवाय संपर्क जोडणे.
- एखादा मेसेज एकापेक्षा अधिक लोकांना कॉपी आणि पेस्ट केला, तोच अनेकांना फॉरवर्ड केला.
- यासोबतच आपण मेसेजिंग करताना किंवा चॅटिंग करताना, बातम्या, आर्टिकल्सच्या न्यूज लिंक शेरिंग. व्हायरल रिल्सच्या लिंक फॉरवर्ड, शेरिंग करणं नियमबाह्य आहे.
तुम्ही व्हॉट्सअप वापरताना एखादी ऍक्टिव्हिटी सलग सारखी-सारखी करत असाल, व्हॉट्सअप फेसबुकला कनेक्ट करत असाल, मोबाईलमध्ये सिम नाही तरी वेब
किंवा वेगवेगळ्या डिव्हाईसवर अकाऊंट चालवत असाल तर या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुमचंही अकाउंट माझ्यासारखं बंद होऊ शकतं.
Whatsapp Ban Kase Kadave
अशी काही बेसिक कारणं यामागे आहेत मात्र अधिक विस्तृत माहिती पुढील लिंकवर मिळेल.
https://www.whatsapp.com/legal/terms-of-service
तुमचा खोळंबा होऊ नये यासाठी, WhatsApp च्या सेवाशर्ती वाचून तसं ते वापरावं. अगदी हीच गोष्ट इतर सोशल मीडियाची माध्यमं वापरताना त्या त्या माध्यमांच्या सेवाशर्ती वाचायला हव्यात.
कंपन्यांनी बिजनेस अकाउंट वापरावे, कोणत्याही संस्था त्यांच्या कारभारासाठी व्हॉट्सअपचा वापर करत असतील तर ते यूजर्स आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी धोक्याचं आहे.
व्हॉट्सअप बॅन झालं तर काय करावं?
1. सर्वात आधी अकाऊंट बॅन झाल्यावर घाबरून न जाता, दीर्घ श्वास घ्यावा. घाई गडबडीत पुन्हा पुन्हा लॉग इन करू नये, व्हॉट्सअप सुरु करण्यासाठी उगाच धडपड करू नये.
2. जे मेसेज डिस्प्ले होत आहेत, त्यानुसार ते वाचून पुढील पावलं उचलावीत.
3. व्हॉट्सअपच्या Help center ( https://faq.whatsapp.com/ ) या लिंकवर जाऊन सर्वात खाली Contact us येथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी.
4. अकाउंट बॅन झालेले असल्यास Grievance Officer सोबत मेलद्वारे संपर्क साधावा. आपली योग्य तक्रार करावी.
5. Two factor authentication कायम सुरु ठेवावे.
6. Recovery ऑप्शन्ससाठी ईमेल, दुसरा मोबाईल नंबर देऊन ठेवावा.