Shet Jamin Mojani | शेत जमीन गुंठ्यात कशी मोजावी ? जाणून घ्या ही सोपी पद्धत

Shet Jamin Mojani :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये आपली शेतजमीन किंवा जमीन गुंठ्यांमध्ये कशी मोजता येते. किंवा कशी मोजावी हे आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

गुंठ्यामध्ये जमीन मोजणी कशी करावी. एक गुंठा म्हणजे किती जमीन असते. 1 एकर मध्ये जमीन कशी मोजावी ?, 1 हेक्टर म्हणजे किती जमीन असते. हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Shet Jamin Mojani

तसेच सर्वप्रथम गुंठ्यांमध्ये आपली शेत जमीन कशी मोजावी लागते. याबाबत माहिती जाणून घेऊया, शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की शेत जमीन गुंठ्यांमध्ये मोजतो. परंतु गुंठा म्हणजे नेमकी किती असते. त्याचबरोबर जमीन मोजणी कशी करायची असते. हे या लेखात पाहणार आहोत.

आता गुंठ्या मध्ये जमीन कशी मोजायची, ते सर्वप्रथम जाणून घेऊया. आपली जमीन आयतकार किंवा चौरसकार असेल. तर जमिनीच्या सर्व बाजू किंवा समोरासमोरील बाजूच्या अंतर समान असतील. तर 1 गुंठा म्हणजे 1089 चौरस फूट होय.

जमीन गुंठ्यात कशी मोजावी

1 एकर म्हणजे 40 गुंठे, 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे असे शेत जमीन असते. सर्वात पहिल्यांदा आपली जमिनीची बाजू अंतर फुटांमध्ये मोजून घ्यायचे आहे. यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील, त्याचा गुणाकार करावा लागतो.

येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळास 1089 सोबत भागाकार करावा. आपली जमीन किती गुंठे आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. ती कसे करायचे ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.

 

शेतजमीन मोजणी कशी करावी ?

क्षेत्रफळ = लांबी × रुंदी. गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ (चौरस फूट) 1089. एकर = गुंठे/40 असे आपली जमीन मोजणी करून गुंठे किती आहे, हे समजेल. शेतकरी बांधवांनो अशाप्रकारे आपण शेतजमीन गुंठ्यांमध्ये मोजू शकता. त्यासाठी प्रोसेस आपण वरती सांगितलेले आहे.

त्याप्रमाणे आपली आपण शेतजमीन गुंठ्यांमध्ये मोजू शकता, ही अतिशय महत्त्वाची माहिती होती. इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करायची आहे. आणि आपल्या वेबसाईटला परत भेट देत रहावे. जेणेकरून उपयुक्त माहिती आपल्याला रोज मिळत राहील धन्यवाद.

Leave a Comment