शेअर मार्केटसाठी उत्तम मराठी पुस्तके | Share Market Books in Marathi, शेअर मार्केट पुस्तके मराठी पीडीएफ मध्ये |शेअर बाजार पुस्तक pdf मोफत डाउनलोड करा |मराठीतील सर्वोत्तम शेअर मार्केट पुस्तके |नवशिक्यांसाठी मराठीत शेअर मार्केट पुस्तके |भारतीय शेअर बाजार पुस्तके pdf |मराठीतील शीर्ष 5 शेअर मार्केट पुस्तके |इंट्राडे ट्रेडिंग पुस्तके मराठी पीडीएफ मोफत डाउनलोड करा |मराठीत शेअर बाजार
आपण कोणत्याही विषयांचा अभ्यास करतो,तेव्हा त्यासाठी महत्वपूर्ण असतात ते पुस्तके. पुस्तके आपल्याला त्या विषयांचे सखोल ज्ञान देतात. शेअर मार्केट हा असा विषय आहे,ज्यामध्ये सतत अपडेटेड राहणे गरजेचे असते. नवीन संकल्पना तुम्ही इंटरनेटवरुन समजून घेऊ शकता.
शेअर मार्केटसाठी उत्तम मराठी पुस्तके, Share Market Books in Marathi 2024
परंतु मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी काही पुस्तके वाचने गरजेचे आहे.आजच्या लेखात आपण अशा काही पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत जी पुस्तके शेअर मार्केटचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने वाचायला हवीत.
अनुवादीत आणि मूळ इंग्रजी भाषेत असलेली पुस्तके
१) रोमांसिंग द बॅलेन्स शीट Romancing the Balance Sheet – जर तुम्ही स्टॉक मार्केट नव्याने शिकत असाल तर एक पुस्तक तुम्ही जरूर वाचले पाहिजे,ते म्हणजे रोमांसिंग द बॅलेन्स शीट या पुस्तकांचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे.मराठीत अनुवाद असलेल्या पुस्तकांचे नाव आहे बॅलेन्स शीट व फायनान्स समजून घेताना.या पुस्तकाचे लेखक आहेत अनिल लांबा.अनिल लांबा यांनी या पुस्तकांमध्ये फायनाशिल स्टेटमेंट,बॅलेन्स शीट,आणि प्रॉफिट या बरोबरच लॉस स्टेटमेंट या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांना फायनान्स म्हणजे काय हे अगदी बेसिकपासून समजून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.हे पुस्तक हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध आहे.
२) वॉरन बफे Warren Buffet (Marathi) – अतुल कहाते लिखित वॉरन बफे हे पुस्तक मेहता पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.वॉरेन बफे यांची संपूर्ण जीवनकथा तसेच गुंतवणूक कशाप्रकारे करावी.गुंतवणूक करताना कंपनी कशी निवडावी,याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.वॉरेन बफे हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असले तरी त्यांचे साधेपण आणि समाजा प्रती असलेली त्यांची सामाजिक जबाबदारी हे सर्व या पुस्तकात अत्यंत उत्तम रीतीने मांडले आहे.
३) रॉबर्ट किओसकी यांचे रिच डॅड पुवर डॅड Rich Dad Poor Dad (Marathi) – हे पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता.सोशल मिडियावर या पुस्तकांची चर्चा सर्वाधिक झाली आहे.या पुस्तकांमध्ये तुम्हाला बचत करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत.तसेच पर्सनल फायनान्स कसे करावे यांची देखील माहिती दिली आहे.
४) बॅबिलॉनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस Babylonmadhil Sarvadhik Shrimant Manus(The Richest Man In Babylon) (Marathi) – हे जॉर्ज एस क्लासन लिखित पुस्तक देखील तुम्ही वाचू शकता.गुंतवणूक कशी करावी,उत्तम बचतीचे मार्ग,तुम्ही जेव्हा पैसे कमावता तेव्हा त्यातील किती टक्के पैसे तुम्ही बाजूला ठेवायला हवे.बाजूला ठेवलेले पैसे कशा प्रकारे गुंतवणूक करावे यांची सविस्तर माहिती दिली आहे.गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जे काही रिटर्न मिळतात त्या पैशाला तुम्ही पुन्हा कसे गुंतवणूक करावे.अशा प्रकारे एक उत्तम सायकल कसे बनवावे यांची माहिती या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक मराठी आणि हिंदी भाषेत देखील उपलब्ध आहे.
५) द इंटेलिजेंट इन्वेस्टर The Intelligent Investor (Marathi) – वॉरन बफे लिखित हे पुस्तक आहे.हे पुस्तक इंग्लिश आणि हिंदी भाषेत अनुवादित आहे.या पुस्तकांच्या आता पर्यत १० लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.या पुस्तकांचे हिंदी भाषांतर साकीर आलम यांनी केले आहे.असे देखील म्हटले जाते हे पुस्तक वाचल्यामुळे अनेक लोक हे गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे या पुस्तकात भारतीय कंपन्या आणि त्यांचे विश्लेषण केले आहे.जर तुम्हाला उत्तम वॅल्यू गुंतवणूक करायची असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे.आता मराठीमध्ये देखील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.मराठी अनुवाद अतुल कहाते यांनी केला आहे.
६) शेअर बाजार गाईड Share Market Guid by SUDHA SHRIMALI – श्रीमती सुधा श्रीमाळी यांनी लिहिलेले पुस्तक २०२० साली प्रकाशित झाले आहे.नव्याने शेअर मार्केट शिकणाऱ्यासाठी हे पुस्तक अतिशय उत्तम आहे. भारतीय लेखिकेने हे पुस्तक लिहिले असल्यामुळे या पुस्तकांची भाषा अतिशय सोप्पी आणि सरळ आहे.शेअर बाजाराचे कामकाज कसे चालते,म्युच्युल फंड आणि एकूण मालमत्ता वाटप यासारखी माहिती या पुस्तकात सविस्तर दिली आहे.हे पुस्तक हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
७) स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी Kaise Stock market Mein Nivaise Kare – टीव्ही १८ ब्रॉडकास्ट यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी या संबंधित हे पुस्तक आहे.या पुस्तकांमध्ये शेअर मार्केट आणि त्यांची सुरुवातीची अगदी बेसिक माहिती उत्तम शब्दांत दिली आहे.या पुस्तकांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे महत्व उत्तम रीतीने समजून सांगितले आहे. गुंतवणूक करणे अतिशय महत्वाचे आहे, कारण त्यामुळे तुमचा पैसा वाढत जातो. हिंदी भाषेत हे पुस्तक उपलब्ध आहे.
८) वॉरेन बफेच्या गुंतवणुकीचे रहस्य Warren Buffett Ke Nivesh Ke Rahasya – शेअर मार्केटवर या विषयांवर जी पुस्तके सर्वाधिक वाचली गेली आहेत,त्यामध्ये हे एक पुस्तक आहे.लेखक रॉबर्ट जी हॅगस्ट्रॉम यांनी हे पुस्तक लिहिले आहे.या पुस्तकांमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा सविस्तर अभ्यास करायला मिळेल.या पुस्तकांमध्ये अगदी शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर कसे खरेदी करायचे या सर्व बेसिक माहिती दिल्या आहेत. हे पुस्तक हिंदी भाषेत अनुवादित केलेले आहे.
९) लर्न टू अर्न बाय पिटर लिंच Learn To Earn – पीटर लिंच हे अमेरिकेतील एक व्यवस्थापक आहेत.ते निधी व्यवस्थापन करतात.अमेरिकेतील अर्थव्यवस्था अगदी शून्या पासून ते जगातील सर्वात ताकदवान अर्थव्यवस्था कशी झाली यांचे वर्णन पिटर लिंच यांनी केले आहे.लिंच म्हणतात जे मोठे गुंतवणूकदार आहेत,त्यांच्याकडून सुरुवातीच्या काळात अनेक मोठ्या चुका होतात.तो गुंतवणूकदार त्यातून शिकतो. सध्या तरी हे पुस्तक फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
१०) द धंदो इन्व्हेस्टर The Dhandho Investor – हे पुस्तक शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अनेकांचे आवडीचे पुस्तक आहे.कारण या पुस्तकात जोखीम पत्कारून तुम्ही कशा प्रकारे उत्तम परतावा कमावू शकता हे सांगितले आहे.मोहनीश पाबराई यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
वरील सर्व पुस्तके ही इंग्लिश पुस्तकाचे अनुवाद आहेत. काही पुस्तके ही हिंदी मध्ये अनुवादित आहेत,तर काही पुस्तके फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.आता आपण मराठीतील अशी काही पुस्तके पाहणार आहोत जे तुम्हाला शेअर बाजाराविषयी उत्तम माहिती देऊ शकतात.
१) भारतीय शेअर बाजारांची ओळख Bhartiya Share Bazaarachi Olakh– जितेंद्र गाला लिखित हे पुस्तक आहे.शेअर बाजारात करोडपती बनण्याची गुरुकिल्ली अशी टॅग लाइन असलेल्या या पुस्तकात शेअर बाजारातील अगदी छोट्या – छोट्या संकल्पना देखील अतिशय उत्तम रीतीने समजून सांगितले आहे.यामध्ये इन्वेस्टमेंट बेसिक,प्रायमरी बेसिक,आयपीओ संदर्भात माहिती,स्टॉक मार्केट मध्ये कसा प्रवेश करायचा,स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे फायदे, स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे,बाजारावर परिणाम करणारे घटक,गुंतवणूकदार पैसे कसे गमावतात.असे विषय या पुस्तकात अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहेत.
२) टेक्निकल एनालिसिस आणि कैडलास्टिकचे मार्गदर्शन Technical Analysis Ani Candlestickche Margadarshan– रवी पटेल या लेखकांनी अतिशय उत्तम रीतीने टेक्निकल एनालिसस आणि कैडलास्टिक या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.या पुस्तकांत खालील टॉपिक कव्हर केले आहेत.शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना,स्टॉक मार्केट म्हणजे काय? विश्लेषण आणि एकूण परिचय, कैडलास्टिकचा परिचय,चार्ट पॅटर्न परिचय,तांत्रिक निदर्शक परिचय,स्टॉक मार्केट थेअरी,स्टॉक लॉस थिअरी,स्टॉक निवड धोरण,विविध केस स्टडीज या पुस्तकात दिल्या आहेत.
३) इंट्राडे ट्रेडिंग ओळख Intraday Trading Marathi Book – अंकित गाला आणि जितेंद्र गाला यांचे इंट्राडे ट्रेडिंग हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.अनेकजण इंट्राडेला झटपट पैसे कमावण्याचे माध्यम समजतात आणि मोठी रक्कम गमावून बसतात.या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला इंट्राडे विषयी सविस्तर माहिती मिळते.या पुस्तकात सिक्युरिटीज मार्केटचा परिचय,डे ट्रेडिंग परिचय,यशस्वी डे ट्रेडरचे गुण,डे ट्रेडिंग मला शोभेल का?,कशी सुरुवात करावी, जोखीम नियंत्रण आणि जोखीम व्यवस्थापन,मनाचे खेळ,टाळावयाच्या गोष्टी,स्टॉक निवडीसाठीचे धोरण,जागतिक बाजार सहसंबंध,माहितीचे स्त्रोत,तांत्रिक विश्लेषण,अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार,कर आकारणी हे विषय या पुस्तकांच्या माध्यमातून उत्तम रीतीने सांगितले आहेत.
४) फ्यूचर आणि ऑप्शनचे मार्गदर्शन Future Aani Optionche Margdarshan – Guide to Future & Options Marathi – फ्यूचर आणि ऑप्शनचे मार्गदर्शन या पुस्तकांचे लेखक हे अंकित गाला आणि जितेंद्र गाला हे आहेत.तुम्हाला जर उत्तम पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचावे.फ्यूचर्स म्हणजे काय? त्यांची किंमत काय असते,इंडेक्स फ्यूचर वापरणे,स्टॉक फ्यूचर वापरणे,विविध पर्यायाचा परिचय,स्टॉक पर्याय वापरणे,खुल्या व्याज,माहितीचे स्त्रोत,कर आकरणी,बँक निफ्टी,cnx १०० असे अनेक महत्वाचे विषय या पुस्तकात उत्तम रीतीने सांगितले आहेत.