फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व 2024– Finance Meaning In Marathi

फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व – Finance Meaning In Marathi, आपण फायनान्स या शब्दाबद्दल नेहमी बातम्या, सोशल मीडिया, मासिक यामध्ये ऐकत असतो. देशात जेव्हा बजेट डिक्लेअर होतो तेव्हा फायनान्स शब्द हा खूप चर्चेत असतो.

आजच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये फायनान्स शब्द जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण फायनान्स विषयावर सखोल माहिती करून घेऊ त्याचे विविध प्रकार त्याचे महत्त्व, फायनान्स कंपन्यांची कार्य याबद्दल जाणून घेऊ. हा लेख संपूर्ण वाचल्यावर तुम्हाला फायनान्स या शब्दाबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होईल अशी आशा करू.

फायनान्स म्हणजे काय ? – Finance Information In Marathi

फायनान्स चा मराठी मध्ये अर्थ वित्त असा होतो मध्ये पैसा गुंतवणूक बचत इतर पैशासंबंधीच्या बाबींचे वर्णन असते फायनान्स मध्ये स्टॅटिस्टिक्स इकॉनोमी अशा बाबींचा उल्लेख होतो फायनान्स हा खूप मोठा विषय आहे त्याला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी समजाव्या लागतील.

फायनान्स हा शब्द फ्रेंच भाषेपासून निर्मित आहे जो की 1800 च्या दशकात लोकप्रिय झाला फायनान्स म्हणजे पैशाचे व्यवस्थापन फायनान्स हा शब्द कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो फायनान्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय योग्य प्रकारे अभ्यास करावा लागेल. कोणताही व्यवसाय किंवा कंपनी सुरळीत चालण्यासाठी पैशाचा थेट संबंध येतो. फायनान्स मध्ये बँकिंग, कर्ज, गुंतवणूक मालमत्ता या विविध बाबींचा समावेश होतो. त्यामुळेच जर तुम्ही फायनान्स या विषयाचा सखोल अभ्यास केलात की तुम्हाला या सर्व या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान प्राप्त होते.

फायनान्स चे अर्थ काय आहे ? – Finance meaning in Marathi

फायनान्स मध्ये एखादी व्यक्ती किंवा कंपनी आपल्याकडे असणाऱ्या मालमत्ता किंवा पैशाचे नियोजन करते. आपल्याकडे येणारा पैसा आणि आपण त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करतो तो कुठे खर्च करतो किंवा गुंतवतो या बाबींचे योग्य ज्ञान असल्यास आपण एक योग्य फायनान्स डिसिजन घेऊन प्रगती करू शकतो. त्यामुळेच फायनान्स विषय आणि त्यामधील असलेल्या महत्त्वाच्या बाबी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

फायनान्स किती प्रकारचे आहेत ? – फायनान्स चे प्रकार (Types of Finance)

फायनान्स हा अर्थव्यवस्थेचा मूलभूत घटक आहे एक उद्योग सुरू करण्यासाठी फायनान्स ची आवश्यकता भासते. फायनान्स चे साधारण तीन प्रकार आहेत.

  • वैयक्तिक फायनान्स (Personal Finance)
  • कॉर्पोरेट फायनान्स (Corporate Finance)
  • सार्वजनिक फायनान्स (Public Finance)
  • वैयक्तिक फायनान्स (Personal Finance)

यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन तो कसा करतो यालाच वयक्तिक फायनान्स किंवा पर्सनल फायनान्स म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पैशाच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात अल्पकाळ आणि दीर्घकाळ लक्षात घेऊन त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. वैयक्तिक फायनान्स मध्ये साधारणता खालील बाबी महत्त्वाच्या असतात

आपल्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणे.

  • विमा खरेदी करणे.
  • बचत आणि गुंतवणूक करणे.
  • रिटायरमेंट प्लॅनिंग करणे.

अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येयांची पूर्तता करण्यासाठी योग्य फायनान्शिअल प्लॅनिंग करणे.
कर व्यवस्थापन करणे.

कॉर्पोरेट फायनान्स (Corporate Finance)

एखादी कंपनी किंवा व्यवसाय इक्विटी गुंतवणूक किंवा क्रेडिट लाईन द्वारे फायनान्स मिळवतात.अर्ज घेऊन त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि कंपनीचा विस्तार करणे यासाठी कॉर्पोरेट फायनान्स महत्वाचा ठरतो.

स्टार्टअप कंपन्या इन्वेस्टर कडून पैसे घेतात आणि आपला व्यवसाय चालवतात. एखादी स्टार्टअप कंपनी चांगल्या प्रकारे नफा मिळवत असेल तर ती शेअर मार्केट आयपीओ मध्ये लिस्ट होते त्यांना एक मोठी रक्कम आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी मिळते.

सार्वजनिक फायनान्स (Public Finance)

पब्लिक फायनान्स म्हणजेच सार्वजनिक वित्त यामध्ये केंद्र सरकार राज्य स्थानिक सरकार यांच्याकडे असलेल्या पैशाचे नियोजन. यामध्ये प्रामुख्याने सरकारचे उत्पन्न आणि खर्च तसेच सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक यांचा लेखाजोखा सरकार ठेवते.

सार्वजनिक फायनान्स मध्ये सरकार आरोग्य, दळणवळ, वाहतूक, वीज विविध वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री, बांधकाम विभाग हे सार्वजनिक फायनान्स चे मुख्य घटक आहेत ज्यातून फायनान्स चेसरकार द्वारे नियोजन केले जाते.

फायनान्स कंपनीचे कार्य काय असते? | Work of Finance Company

एखादी फायनान्स कंपनी खालील कार्य करताना दिसतात

  • निधी किंवा मालमत्तेचे व्यवस्थापन करणे.
  • चांगली गुंतवणूक करणे.
  • व्याज दराने कर्ज प्राप्ती करणे.
  • प्रमुख वित्तीय बाबी | Key Finance Terms

ॲसेट (मालमत्ता) – मे साधारणता रोख रक्कम रियल इस्टेट गोल्ड  शेअर या गोष्टींचा समावेश होतो.

लायबिलिटी किंवा दायित्व – याचाच अर्थ की तुमच्या वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट फायनान्सच्या दृष्टिकोनातून तुमच्याजवळ असलेले लोन किंवा देणे करी.
बॅलन्स शीट – हे एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामार्फत तुमच्याकडे असलेले मालमत्ता म्हणजेच ऍसिड आणि दायित्व याचा पाठपुरावा होतो. मालमत्तेमधून दायित्व काढून टाकल्यास तुम्हाला स्वतः जवळ असलेल्या संपत्तीचा आढावा मिळतो.
कॅश

फ्लो – कॅश फ्लो म्हणजे तुमच्या पॉकेट मध्ये येणारा पैसा किंवा तुमच्या पॉकेट मधून जाणारा पैसा याला कॅश फ्लो म्हणतात. कॅश फ्लो हे एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीच्या बाबतीत फायनान्स समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
इक्विटी – स्टॉक्स ला आपण इक्विटी असेही म्हणतो इक्विटी म्हणजेच मालकी. प्रत्येक शेअर हा आपण त्या कंपनी मालकीचा एक भाग दर्शवतो.
लिक्विडिटी – लिक्विडिटी म्हणजे तुमच्याकडे असलेली मालमत्ता जी रोख रकमेत किती सहज रूपांतर करता येते. जसे की रियल इस्टेट प्रॉपर्टी आपण रोख रक्कम मध्ये बदली करण्यासाठी बराच कालावधी आठवडा किंवा महिने लागतात स्टॉक असल्यास तो आपण विकून दोन ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये रोख रकमेत रूपांतरित करू शकतो यालाच लिक्विडिटी म्हणतात.
प्रॉफिट – एखाद्या व्यवसायाने आपला व्यवसाय करून किती नफा किंवा तोटा केला याची माहिती मिळते. आपल्या सर्व खर्चा नंतर मिळालेल्या मिळकतीवरून नफा किंवा तोटा आपण काढू शकतो.

मराठीत फायनान्स म्हणजे काय?
फायनान्स म्हणजेच वित्त. कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा कॉर्पोरेट आर्थिक नियोजन यालाच फायनान्स म्हणतात.

फायनान्समध्ये काय कार्य असते?
फायनान्स मध्ये साधारणता बँकिंग कर्ज गुंतवणूक मालमत्ता देणे देणघेण याबद्दलचा अभ्यास करणे अशा प्रकारची कार्य समाविष्ट असतात.

Leave a Comment