शैक्षणिक कर्जाबद्दल संपूर्ण माहिती । 40 लाखांपर्यंत विनातारण सरकारी बँकेत (Education Loan Process in Marathi), विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज प्रक्रिया मराठीत |शैक्षणिक कर्ज प्रक्रिया मराठी पीडीएफ मध्ये |सरकारकडून शैक्षणिक कर्ज |शैक्षणिक कर्ज व्याज दर |शैक्षणिक कर्जाची कागदपत्रे |एसबीआय शैक्षणिक कर्ज |शैक्षणिक कर्ज व्याज दर sbi |बँक ऑफ इंडिया योजना
शैक्षणिक कर्ज घेण्याबद्दल आपल्या मनात सर्वप्रथम विचार येतो जेव्हा विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवतात, तेव्हा साहजिकच कोणत्याही व्यक्तीच्या घरात खूप आनंददायी वातावरण असते. कुटुंबातील सर्व सदस्य भविष्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असतात जसे की कोणता कोर्स सर्वोत्तम आहे, कोणते कॉलेज सर्वोत्तम आहे, कोणता अभ्यास अधिक चांगल्या संधी देतो इत्यादी.
परंतु केवळ आपले पालक त्यापेक्षाही पुढचा विचार करतात आणि पैशाचं नियोजन करतात, जे सहसा विद्यार्थ्यांना त्यावेळी माहिती नसते. त्यामुळे विदयार्थी आणि पालकांनी शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी Education Loan Process मराठीमध्ये या लेखात मांडली आहे.
या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया आणि शैक्षणिक कर्जाविषयी सर्व काही, मला खात्री आहे की मी येथे गोळा केलेली बरीच माहिती तिही मराठीमध्ये (Education Loan Process in Marathi) तुम्ही कुठेही वाचली नसेल, त्यामुळे तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लेख वाचण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ द्या.
Education loan Eligibility, Education Loan Process in Marathi
जेव्हा आपण एज्युकेशन लोनबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते की “एज्युकेशन लोनसाठी कोण पात्र आहे?” म्हणून आपण यापासून सुरुवात करुयात :
शैक्षणिक कर्जासाठी पात्रता (Eligibility Criteria for Education Loan)
- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.
- विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेद्वारे किंवा निवडीच्या इतर कोणत्याही प्रक्रियेद्वारे गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवलेला असावा.
- संस्था आणि अभ्यासक्रम राज्य किंवा केंद्र सरकारने मंजूर केलेला असावा.
- शैक्षणिक कर्जासाठी किमान गुण खालीलप्रमाणे आहेत, General (60%), OBC (55%), SC/ST (50%)
- शैक्षणिक कर्जासाठी वय हा महत्त्वाचा निकष नाही, जरी विद्यार्थ्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असले तरी त्याचे/तिचे पालक त्यांना या कर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून सामील करू शकतात
- आणि पालक विद्यार्थ्याच्या वतीने कागदपत्रांवर सह्या करू शकतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी कर्जाच्या नवीन कागदपत्रांवर स्वाक्षरी केली पाहिजे.
- मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश झाला असेल तरीही कर्ज मंजूर केले जाऊ शकते. मात्र, केवळ शासनमान्य शैक्षणिक शुल्क मंजूर केली जाते.
अभ्यासक्रम: शैक्षणिक कर्जासाठी पात्र असलेले अभ्यासक्रम (Courses eligible for ducation loan in Marathi)
- बारावीच्या नंतर असलेले सर्व अभ्यासक्रम शैक्षणिक कर्जासाठी पात्र आहेत.
- तसेच काही पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी हि पात्रता असेल तरीही कर्ज मंजूर होऊ शकते.
- बँका कौशल्य विकास अभ्यासक्रमांना सुध्दा वित्तपुरवठा करतात.
- केंद्र सरकार/राज्य सरकार/AICTE/ICMR द्वारे मंजूर केलेले अभ्यासक्रम
- मान्यताप्राप्त विद्यापीठांशी संलग्न अभ्यासक्रम.
- वैमानिक, पायलट प्रशिक्षण, शिपिंग.
शैक्षणिक कर्जामध्ये कोणते खर्च समाविष्ट केले जातात? (Expenses covered for Education Loan explained in Marathi)
- ट्यूशन फी (Tuition Fees)
- वसतिगृह शुल्क (Hostel Fees)
- मेस चार्जेस (Mess Charges)
- परीक्षा शुल्क (Exam Fees))
- लायब्ररी शुल्क
- प्रयोगशाळा शुल्क
- पुस्तके आणि स्टेशनरी (Books and Stationary)
- कोर्ससाठी आवश्यक असल्यास लॅपटॉप (Laptop)
- सुरक्षा ठेव
- अभ्यासक्रमासाठी लागणारी उपकरणे (Educational Equipments)
- अभ्यास दौऱ्याचा खर्च (Study Tour)
- हे सर्व खर्च संस्थेने दिलेल्या मागणी पत्रात नमूद असावेत.
अ) विद्यार्थ्याचा विमा हप्ता
ब) वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्यास विद्यार्थी स्वतंत्रपणे निवासाचा पर्याय निवडू शकतात परंतु या निवासाचा खर्च वाजवी असावा.
बहुतेक बँका शैक्षणिक कर्जाच्या खर्चासाठी विकास शुल्काचा विचार करत नाहीत, परंतु जर संस्थेने स्पष्ट केले की या विकास शुल्काचा वापर केवळ शैक्षणिक हेतूंसाठी केला जाणार आहे तर बॅंक या खर्चाचासुध्दा विचार करू शकते.
मला किती शैक्षणिक कर्ज मिळू शकेल? (How much Education Loan Can I get?)
- आपल्याला 4 लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी 100% कर्ज मिळू शकते आणि 4 लाखांपेक्षा जास्त रकमेवर तुम्हाला 95% पर्यंत कर्ज मिळू शकते,
- 5% मार्जिन मनी तुम्हाला स्वतःला भरावा लागेल. शैक्षणिक कर्जासाठी कोणतीही कमीतकमी किंवा जास्तीत जास्त अशी मर्यादा निर्दिष्ट केलेली नाही परंतु सर्व खर्च वाजवी असावेत.
- मार्जिन रक्कम आपल्याला चारही वर्षाची एकदाच भरावी असे नसते तर ज्या त्या वर्षी फी च्या प्रमाणात त्या त्या वर्षीची मार्जिन रक्कम भरावयाची असते.
शैक्षणिक कर्जासाठी कोण सह-अर्जदार होऊ शकते (Co applicant in Education Loan)
- आई-वडीलांपैकी एक शैक्षणिक कर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून असावा.
- आई-वडील दोघेही हयात नसतील तर जवळचा नातेवाईक सह-अर्जदार म्हणून सामील होऊ शकतो.
- विवाहित व्यक्तीच्या बाबतीत, जोडीदाराने सह-अर्जदार म्हणून सामील होणे आवश्यक आहे.
शैक्षणिक कर्जाचा व्याजदर कसा आकारला जातो?, Interest Rate Charged On Education Loans?
- अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत साधे व्याज आकारले जाते.
- अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर चक्रवाढ व्याजदर आकारला जातो.
- आपल्या इच्छेनुसार आपण अभ्यासक्रम सुरू असताना व्याज भरू शकता.
- परतफेडीसाठी EMI निश्चित करताना अभ्यासक्रम कालावधी दरम्यान जमा झालेले व्याज मूळ रकमेत जोडले जाईल व त्यावर EMI कॅल्क्युलेशन केले जाईल.
- सर्वात महत्वाचे: काही लोक असे गृहीत धरतात की अभ्यासक्रम सुरू असतानाच्या कालावधीनंतर व्याज आकारले जाईल
- परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे, आपण कर्ज घेतल्यापासून त्यावर व्याज आकारणी चालू होते,
- फक्त या व्याजाची मागणी अभ्यासक्रम चालू असतानाच्या कालावधी मध्ये न होता अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मुद्दलीमध्ये जमा करून त्यावर EMI कॅल्क्युलेशन केले जाते.
- अर्जदार हे व्याज भरू शकतात परंतु ते पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि अजिबात अनिवार्य नाही.
शैक्षणिक कर्ज हमी योजना: Credit Guarantee Fund Scheme for Educational Loans (CGFSEL)
- बहुतेक जणांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न सतावत असतो कि “विनातारण किती रकमेपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते ?” (How much education loan can I get without collateral).
- बँकांना मालमत्ता तारण किंवा जामीनदार देण्यास सक्षम नसलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाचा लाभ मिळावा हा मुख्य हेतू या योजनेमागे आहे.
- भारत सरकार CGFSEL द्वारे 7.50 लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर देते (हे पुढे लेखात अधिक तपशीलवार वर्णन केले आहे). रु. 7.50 लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी बँका कधीही मालमत्ता तारण मागत नाहीत.
7.50 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी बँका तुमच्या शैक्षणिक कर्जासाठी मालमत्ता तारण मागतात. शैक्षणिक कर्जासाठी बँका खालीलप्रमाणे मालमत्ता तारणसाठी मागणी करतात:
- कर्जाच्या रकमेच्या समतुल्य रकमेची मालमत्ता असावी.
- कुटुंबातील सदस्याच्या नावावर मालमत्ता असावी.
- त्रयस्थ व्यक्तीची देखील मालमत्ता स्वीकारू शकतात, पण मालमत्ता मालक कर्जास सह-अर्जदार किंवा हमीदार म्हणून सामील झाला पाहिजे.
- ओळखण्यायोग्य (कुंपण किंवा कंपाउंड केलेला खुला प्लॉट) मोकळा भूखंड स्वीकारला जातो परंतु तो अकृषिक असावा.
- शैक्षणिक कर्जासाठी शेतजमीन सुरक्षा म्हणून स्वीकारली जात नाही.
- रस्त्यांची चांगली जोडणी असलेली मालमत्ता.
- शासन सिक्युरिटीज/सार्वजनिक क्षेत्रातील रोखे/NSC, KVP, जीवन धोरण, विद्यार्थी/पालक/पालक/इतर निकटवर्तीय कुटुंबातील सदस्य (आई/भाऊ/बहीण/पती/पत्नी) यांच्या नावे सोने आणि बँक ठेव बँकेलाही मान्य आहे.
- गृह कर्ज असणाऱ्या मालमत्तेवर सुद्धा शैक्षणिक कर्ज घेता येते, सहसा नजीकच्या काळात घेतलेल्या गृह कर्जाच्या मालमत्तेचा वापर करणे कठीण असते परंतु आपण आपल्या जुन्या गृह कर्जाची बऱ्यापैकी परतफेड केलेली असेल तर मात्र नक्की आपल्याला हि मालमत्ता शैक्षणिक कर्जासाठी तारण म्हणून वापरता येईल. खालील दिलेल्या तक्त्यामध्ये हे समजावून सांगितलेले आहे.
- घराची सध्याची किंमत (A) Rs. 40,00,000/-
- गृहकर्जासाठी सोडलेली मार्जिन (B) Rs. 4,00,000/-
- सध्याचे शिल्लक गृहकर्ज (C) Rs. 10,00,000/-
- मालमत्तेची किंमत जी गृहकर्जाला तारण दिल्यानंतरही शिल्लक राहते. (A-B-C) Rs. 36,00,000/-
आपल्या शिक्षण संस्थेने दिलेल्या फी स्ट्रक्चरनुसार संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीसाठी शैक्षणिक कर्ज मंजूर केले जाते. शैक्षणिक कर्जाचे वितरण दरवर्षी अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी केले जाते. उदाहरणार्थ: एका वर्षासाठी तुमची कोर्स फी रु. 1 लाख तर 4 वर्षांसाठी एकूण फी 4 लाख आहे तर आपण शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकेला त्यावर्षीची रु 1 लाख फी कॉलेज ला पाठवायला सांगू शकता.
मागील वर्षाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दिल्यानंतरच बँक फीची पुढील रक्कम कॉलेज ला पाठवते. काहीवेळा एखादा विद्यार्थी मागील परीक्षेत नापास झाला आणि पुन्हा परीक्षेला बसू शकतो आणि उत्तीर्ण झाला तरच बँक पुढील वर्षासाठी पैसे देईल.
काही अपरिहार्य कारणास्तव तुम्ही शिक्षणातून गॅप घेतला असेल आणि तुम्ही सांगितलेले कारण बँकेला पटत असेल तर बँक उर्वरित अभ्यासक्रमासाठी कर्ज वितरीत करेल. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 2 वर्षांसाठी मुदत वाढवून दिली जाऊ शकते.
जेथे मार्जिन लागू असेल तेथे तुम्हाला एकाच वेळी पूर्ण मार्जिन भरण्याची गरज नाही, ते तुम्ही वार्षिक फी भरताना त्यात्या वर्षीचे मार्जिन भरू शकतात. बर्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या जागांची प्रवेश पक्का करण्यासाठी प्रवेशाच्या वेळी फी भरावी लागते, जर आपण पहिल्या वर्षी अशी काही फी भरली असेल तर लोन मधून ती आपल्याला परत मिळू शकते
(कृपया लक्षात ठेवा: हे फक्त पहिल्या वर्षासाठीच लागू आहे, त्यामुळे दुसऱ्या वर्षासाठी बँकेने आधीच मंजूर केलेले फी बँकेतर्फे कॉलेज ला पाठवा, कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या वर्षाची फी बँक रिइम्बर्स करत नाही)
शैक्षणिक कर्जाची परतफेड कालावधी, Education Loan Repayment Period
शैक्षणिक कर्जाची परतफेड जास्तीत जास्त १५ वर्ष्यांच्या आत करायची असते.
- उदाहरणार्थ : इंजिनीरिंग चा डिग्री कोर्स ४ वर्षाचा असतो
- कोर्सचा कालावधी 48 Months
- नोकरी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणार वेळ 12 Months
- एकूण हफ्ते 120 Months
- लोन परतफेड करण्याचा जास्तीत जास्त कालावधी 180 Months
- कोर्स सुरु असताना जेवढे व्याज कर्ज खात्याला पडलेले असते ते एकूण मुद्दलात जमा करून त्यावर ई एम आई काढला जातो.
- जर समजा विद्यार्थाने कोर्स अर्धवट सोडला तर बँक त्याला त्वरित शिल्लक कर्ज रकमेची परतफेड करण्यास सांगू शकते आणि हेच कारण आहे कि बँक फक्त गुणवंत विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक कर्ज देतात.
शैक्षणिक कर्जासाठी कमाल मॉरटोरियम कालावधी (Holiday Period for Education loan in Marathi)
जर तुमचा कोर्स 4 वर्षांचा असेल तर मॉरटोरियम कालावधी हा 4 वर्षे (कोर्स कालावधी) + नोकरी किंवा रोजगार शोधण्यासाठी दिलेला 1 वर्षाचा कालावधी असा एकूण पाच वर्ष आणि तुमचा EMI उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच 10 वर्षांसाठी मोजला जाईल.
शैक्षणिक कर्जासाठी विमा अनिवार्य आहे का? (Is Insurance Mandatory in Education Loan?)
- शैक्षणिक कर्जे विनातारण किंवा CGFSEL अंतर्गत कव्हर केलेली असल्यामुळे विद्यार्थ्याची जीवन विमा पॉलिसी सर्व बँकांमध्ये अनिवार्य आहे.
- अश्या कर्ज विम्यामध्ये विद्यार्थांचा जीवन विमा केला जातो ज्यामध्ये कर्ज रक्कम कव्हर केलेली असते.
- अर्जदाराने विनंती केल्यास प्रीमियमची रक्कम कर्जाच्या रकमेत समाविष्ट केली जाऊ शकते.
कोणत्याही कर्जाचा विमा करणे का गरजेचे आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.
शैक्षणिक कर्जावर लागणारे विविध चार्जेस, Charges On Education Loans
- प्रोसससिंग चार्जेस बहुतांश बँका शैक्षणिक कर्जावर प्रक्रिया शुल्क आकारत नाहीत
- थकीत रकमेवरील जास्तीचे व्याज ओव्हरड्यू चार्जेस किंवा दंडात्मक व्याज @2% थकीत रकमेवर आणि थकीत
- कालावधीवर आकारले जाईल.
- प्रीपेमेन्ट चार्जेस प्रीपेमेंट दंड नाही
- टेकओव्हर चार्जेस टेकओव्हर दंड नाही
- लीगल अँड व्हॅलूवेशन चार्जेस शैक्षणिक कर्जासाठी सुरक्षितता म्हणून जिथेही मालमत्ता देऊ केली जाते, तिथे कर्जदाराला कायदेशीर शोधासाठी व्यावसायिक शुल्क वकिलांना आणि गहाण ठेवण्याच्या प्रस्तावित मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी
- मूल्यनिर्मात्याचे व्यावसायिक शुल्क द्यावे लागते.
- स्टॅम्प ड्युटी राज्य मुद्रांक कायद्यानुसार
- विद्या लक्ष्मी प्रोसससिंग चार्जेस Rs 100/- + GST as Portal Charges
शैक्षणिक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents required for Education Loan in Marathi)
- रीतसर भरलेला अर्ज.
- प्रत्येक अर्जदार/सह-अर्जदार/जमीनदारासाठी केवायसी कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/आधार कार्ड इ.)
- राहण्याचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/विद्युत बिल इ.)
- सह-अर्जदाराचे वरील कागदपत्रे
- कार्यालय/व्यवसाय पत्त्याचा पुरावा.
- अलीकडील काढलेला पासपोर्ट आकारातील फोटो.
- आयटीआर किंवा फॉर्म 16 किंवा कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदाराचा उत्पन्नाचा पुरावा, जर असेल तर.
- कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार यांचे मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
- तुम्ही सर्व मूळ कागदपत्रे फक्त पडताळणीसाठी आणावीत.
- शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे:
education loan documents - प्रवेश पत्र
- मागील सर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- शैक्षणिक संस्थेद्वारे दिलेले फी स्ट्रक्चर बोनाफाईड
- शैक्षणिक कर्ज मंजुरीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने
शैक्षणिक कर्ज मंजुरीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने (Process of Education Loan in Marathi)
- विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जासाठी विद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे अर्ज करावा लागतो, ती एक सरकारी वेबसाइट आहे आणि शैक्षणिक कर्जाचे सर्व अर्ज या पोर्टलद्वारे केले जातात.
- विद्या लक्ष्मी पोर्टलवर फॉर्म भरताना तुम्हाला दोन बँकांचा तपशील आणि प्राधान्ये क्रम भरावा लागतो आणि फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या.
- तुमच्या घराच्या जवळ असलेली शाखा किंवा जिथे तुमचे आधीच बचत खाते आहे अशा बँकेतच अर्ज करा.
- शाखेला भेट द्या आणि वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे विद्या लक्ष्मी पोर्टलच्या प्रिंट आउट फॉर्मसह सबमिट करा.
- तुमची बँक तुम्ही दिलेल्या तपशिलांची पडताळणी करेल आणि कर्जाची प्रक्रिया करेल, बँक तुम्ही दिलेल्या शैक्षणिक संस्थेच्या फी स्ट्रक्चर आणि प्रवेश पत्राच्या तपशीलांची पडताळणी करेल.
- सर्व बाबतीत पूर्णपणे प्राप्त झालेला अर्ज असेल तर, तुम्हाला बहुतांश बँकांमध्ये ७ दिवसांत मंजुरी मिळेल.
- तुमचे शैक्षणिक कर्ज मंजूर होताच बँक तुम्हाला कळवेल आणि तुम्हाला शैक्षणिक कर्जाचे मंजुरी पत्र सुपूर्द करेल.
मंजुरी पत्र काळजीपूर्वक वाचा आणि मंजुरीच्या अटी समजू
Not:- शैक्षणिक कर्जाच्या कायदेशीर दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी बँक तुम्हाला शाखेत बोलावेल.
कर्जाची कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर तुम्ही पहिल्या वर्षाची फी भरण्यासाठी कर्ज वितरणासाठी विनंती करू शकता.
एकाच कुटुंबातील दोन मुलांसाठी / विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज
शैक्षणिक कर्ज वैयक्तिक क्षमतेवर वित्तपुरवठा केला जातो, तुम्ही एकापेक्षा जास्त मुलांसाठी देखील शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता. प्रत्येक शैक्षणिक कर्जामध्ये पालक हे सह-अर्जदार असतात.
मला उच्च शिक्षणासाठी अजून एक अतिरिक्त शैक्षणिक कर्ज मिळू शकेल का?
तुम्ही उच्च शिक्षणासाठी अतिरिक्त शैक्षणिक कर्ज मिळवू शकता जसे की मास्टर्स, पीएचडी इत्यादी, तुम्हाला या दुसऱ्या कर्जासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यमान कर्जासाठी मॉरटोरियम कालावधी देखील वाढविला जाऊ शकतो. ७.५० लाखांपर्यंतचे कर्ज जामीनदाराच्या हमीशिवाय मंजूर केले जाते आणि जर तुमची एकूण कर्जाची रक्कम ७.५० लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योग्य जामीनदाराची हमी द्यावी लागेल. दोन्ही कर्जाची मिळून जी एकूण रक्कम होईल त्यानुसार जामीनदार किंवा मालमत्ता तारण अवलंबून आहे.
शैक्षणिक कर्ज नाकारणे
ते दिवस गेले जेव्हा बँका शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत होत्या, आता भारत सरकार शैक्षणिक कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देत आहे त्यामुळे बँका आता शैक्षणिक कर्ज नाकारत नाहीत आणि जेव्हा जेव्हा कर्ज नाकारण्याचे कोणतेही न्याय्य कारण असेल तेव्हा त्या कर्ज अर्जाची पुढील उच्च अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल व नंतर नाकारले जाईल.
शैक्षणिक कर्जासाठी सर्विस एरिया असतो का? (Service Area Approach in Education Loan Process)
काही वेळा काही बँका शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यासाठी तुमचा पत्ता त्यांच्या सेवा क्षेत्रांतर्गत नसल्याचे कारण देऊन कर्ज अर्ज स्वीकारण्यास नकार देतात. पण लक्षात ठेवा ही योजना संपूर्ण भारतात लागू आहे. शैक्षणिक कर्ज मंजूर करताना सेवा क्षेत्राची संकल्पना लागू होत नाही. तरीही शैक्षणिक कर्जासाठी निवासस्थानाच्या जवळच्या शाखेत किंवा तुमचे व तुमच्या पालकांचे बचत बँक खाती असलेल्या ठिकाणी अर्ज करा. वर सांगितल्याप्रमाणे एखादी बँक उपलब्ध असेल तर तुम्ही त्या बँकेशिवाय इतर शिक्षणासाठी अर्ज का करत आहात आणि जर तुम्ही तसे करत असाल तर स्वीकारार्ह कारण असले पाहिजे, हे पालक आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.
शैक्षणिक कर्जासाठी केंद्र सरकारची व्याज अनुदान योजना (Central Sector Interest Subsidy – CSIS)
केंद्र सरकारने ने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची योजना (Central Sector Interest Subsidy – CSIS) सुरू केली आहे. जे विद्यार्थी खालील सर्व बाबींची पूर्तता करतात तेच व्याज अनुदानासाठी पात्र असतील:
ही योजना केवळ भारतातील अभ्यासांसाठी लागू आहे.
NAAC मान्यताप्राप्त संस्थांनी मंजूर केलेले व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रम.
या योजनेअंतर्गत, केवळ तीच शैक्षणिक कर्जे पात्र आहेत जी कोणत्याही मालमत्ता तारण किंवा जामीनदाराच्या हमीशिवाय मंजूर केली जातात.
जास्तीत जास्त रु.7.50 लाखांपर्यंत सबसिडी उपलब्ध आहे
सर्व स्त्रोतांकडून वार्षिक एकूण कुटुंबाचे उत्पन्न रु. 4.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्याने सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे आणि ते ज्या शाखेतून कर्ज घेतले आहे त्या शाखेत जमा करावे.
आधार क्र. सबसिडीची मागणी करण्यासाठी अनिवार्य आहे.