Sukanya Samriddhi Yojana Update 2024 : मित्रांनो, आपल्या पैकी कित्येकांनी मुलीच्या भविष्यासाठी विविध ठिकाणी पैसे गुंतवले असतील. परंतु सुकन्या योजनेत पैसे गुंतवले असतील तर हे खाते चालू ठेवण्यासाठी एक काम तातडीने करावे लागणार आहे.
31 मार्चपर्यंत हे काम केले नाही तर सुकन्या योजनेचे तुमचे खाते बंद होऊ शकते. त्यामुळे या योजनेचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
Sukanya Samriddhi Yojana Update 2024
आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा महिना म्हणजेच मार्च महिना सुरू झाला आहे. या महिन्यात तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते सक्रिय ठेवण्यासाठी त्यात किमान पैसे भरणे हे एक कार्य आहे.
विशेष म्हणजे 31 मार्च 2024 या तारखेपर्यंत PPF आणि SSY मध्ये पैसे जमा न केल्यास, ही खाती निष्क्रिय (बंद) होऊ शकतात.
…तर भरावा लागू शकतो दंड :
सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये किमान रक्कम जमा नसेल तर हे खाते बंद होऊ शकते. तसेच त्यांना पुन्हा चालू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
सुकन्या समृद्धी व पीएफ या योजनेच्या खात्यात तुम्हाला किमान गुंतवणूक ठेवावी लागेल, जेणेकरून तुमचे खाते सक्रिय असल्याचे कळू शकेल. तुम्हाला खात्यात किमान किती रक्कम जमा करावी लागेल, याविषयीची माहिती घेऊ या जाणून.
सुकन्या समृद्धी योजना (SSY) :
तुमचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असेल तर तुम्हाला दरवर्षी किमान 250 रुपये जमा करावे लागतील. हे पैसे जमा न केल्यास तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल. सध्या सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 8.2% व्याज देण्यात येत आहे.
सुकन्या योजनेसंबंधी हे माहीत असावे :
* मुलीच्या जन्मानंतर ती 10 वर्षांची होण्यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले जाऊ शकते.
* तुम्ही हे खाते फक्त 250 रुपयांमध्ये उघडू शकता. यात वार्षिक 8.2 टक्के दराने व्याज देताहेत.
* चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
* सुकन्या योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेच्या अधिकृत शाखेत उघडता येते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF):
भविष्य निर्वाह निधी PPF खाते असलेल्यांसाठी किमान ठेव 500 रुपये आहे, म्हणजेच तुम्हाला एका आर्थिक वर्षात त्यात किमान 500 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही असे न केल्यास तुमचे खाते बंद होऊ शकते. यामध्ये पैसे जमा करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.
तुम्ही 2 वर्षांपर्यंत पैसे गुंतवले नाहीत, तर तुम्हाला एका वर्षात 50 रुपयांऐवजी 100 रुपये दंड भरावा लागू शकते.
पीपीएफशी संबंधित विशेष गोष्टी :
* सध्या पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर 7.1% व्याज दिले जात आहे.
* ठेवींवरील व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. म्हणजेच, ती दरवर्षी मूळ रकमेत जोडली जाते.
* PPF योजनेत, रिटर्न, मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज या तिन्हींवर आयकर सूट मिळते.
* 15 वर्षांसाठी खाती उघडता येतात, ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतात.
* PPF योजनेअंतर्गत, किमान 500 रुपयांसह खाते उघडता येते.
* एका वर्षात खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.